ब्रेकिंग!! मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला मोठा निर्णय…

बीड : येथील सरपंच संतोष देशमुख मर्डर प्रकरणानंतर राज्य हादरून गेलं आहे. राज्यात अनेक भागात मोर्चे, आंदोलन सुरू आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना मकोका लावण्यात आला आहे. काही आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. यातच मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे.

यामुळे राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन होत आहे. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवारांनी संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त केली आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचं वर्चस्व असून त्यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. यामुळे येणाऱ्या काळातमुंडे यांचे मंत्रिपद देखील जाईल, असे बोलले जात आहे.
याबाबत माहिती अशी की, संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये आरोपी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांचे नाव आले आहे. यामुळे प्रकरण तापले आहे. वाल्मिक कराडला वाचवले जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत.

यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली आहे. आता धनंजय मुंडे राजीनामा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावरून राज्यात मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांची पडताळणी करूनच नेमणुका कराव्या, अशा सूचना बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देण्यात आल्या आहेत. यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यात राजकारणात कसं होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.