मतदानाच्या ४ दिवस आधी भाजपचा ‘तो’ निर्णय, केजरीवालांची सत्ता जाण्यापाठीमागचे ठरलं कारण, नेमकं काय केलं भाजपने?

नवी दिल्ली : दिल्लीत भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला आहे. ४८ जागा भाजपच्या पारड्यात जाताना दिसत आहे. आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अशा बड्या नेत्यांना धक्का देत भाजपने आपला मोठा धक्का दिला आहे. या निवडणुकीत मतदानाच्या आधी ४ दिवस अगोदर भाजपने खेळलेली एक खेळी आपच्या पराभवाच मोठे कारण ठरले आहे.

यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपने ही खेळी ५ फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानाच्या अगोदर चार दिवस खेळली होती. १ फेब्रुवारीला मोदी सरकारने अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठा निर्णय घेतला होता. त्यांनी १२ लाखांपर्यंतचे उत्पन्नाला प्राप्तीकरातून सवलत दिली. यामुळे सर्वात जास्त दिलासा हा मध्यमवर्गीय लोकांना मिळाला.
दिल्लीत ४० ते ४५ टक्के मध्यमवर्गीय आहेत. त्यांच्यावर याचा थेट परिणाम झाला. तसेच भाजपने महिलांना २५०० रुपये देण्याची घोषणा केली. त्यामुळेही भाजपकडे महिला वर्ग आकर्षित झाला. पंतप्रधान मोदींनीही आपल्या भाषणात ८ मार्च नंतर महिलांना पैसे मिळतील असे आश्वासन दिले. यामुळे महिलांनी मतदान केले.

दरम्यान, पराभव झालेल्या केजरीवाल यांचा मतदारसंघ असलेल्या नवी दिल्लीत येथे १ लाख मतदारांपैकी ३० ते ३५ हजार मतदार हे सरकारी कर्मचारी आहेत. त्यांच्यावर अर्थसंकल्पातील निर्णयाचा निश्चितच परिणाम झाला. यामुळे असे काही निर्णय भाजपसाठी फायद्याचे ठरले.
आता दिल्लीत या सरकारचे नेतृत्व कोण करणार याबद्दल भाजपच्या गोटात जोरदार चर्चा सुरू झाले आहे. २०१३ पासून गेली १२ वर्षे सत्तेत असणाऱ्या आपला जनतेने २०१५ आणि २०२० मध्ये विक्रमी बहुमत देऊन सत्ता दिली होती, अखेर भाजपने आपची सत्ता खेचत सत्ता काबीज केली आहे.