कर्नाटक विधानसभेत भाजपला बसणार धक्का! एक्सिट पोल काय सांगतोय निकाल…!

बेंगळूर : कर्नाटकात सत्ताधारी भाजपला धक्का बसणार असून असं सी व्होटर सर्वेतून समोर आलं आहे. सी व्होटर ने केलेल्या सर्वेत, काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकत सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे ओपिनियन पोलनुसार कर्नाटकात काँग्रेसला ११५-१२७ जागा मिळू शकतात. भाजपला ६८-८० तर जेडीएसला २३-३५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
बुधवारी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. राज्यात १० मे रोजी एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून १३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. या घोषणेमुळे कर्नाटका राज्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि प्रमुख प्रतिस्पर्धी काँग्रेस यांच्यात चांगलाच संघर्ष पाहण्यास मिळणार आहे. कर्नाटक विधानसभेत धर्मनिरपेक्ष जनता दल हा राज्यातील तिसरा मोठा पक्ष आहे. या ओपिनियन पोलमध्ये २४ हजार ७५९ लोकांची मते घेण्यात आली आहेत. कर्नाटकातील सर्व जागांवर ओपिनियन पोल घेण्यात आला आहे.