BJP Leader : पुण्यातील भाजप नेत्याला खंडणीसाठी कॉल, २५ लाख द्या, अन्यथा तुमचा व्हिडिओ…

BJP Leader : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. याच पार्शभूमीवर पुणे येथील भारतीय जनता पक्षाचे नेते गणेश बिडकर यांना धमकीचा फोन आला आहे. धमकीचा हा फोन आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून आला आहे. हा प्रकार रविवारी रात्री घडला आहे.
त्यानंतर गणेश बिडकर यांनी पुणे पोलीसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चौकशी सुरु केली आहे. गणेश बिडकर यांना मिळालेली ही दुसरी धमकी आहे. यापूर्वी मागील वर्षी मार्च महिन्यात त्यांना धमकी मिळाली होती. BJP Leader

सविस्तर माहिती अशी की, रविवारी (ता.५) सायंकाळी गणेश बिडकर हे लष्कर परिसरात बागबान हॉटेल परिसरात होते. त्यावेळी त्यांच्या मोबाईलवर आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने बिडकर यांच्याकडे २५ लाखांची खंडणी मागितली.


तसेच खंडणी न दिल्यास राजकीय करिअर संपवून टाकेन, व्हिडीओ व्हायरल करेन अशी धमकी दिली. त्यानंतर गणेश बिडकर यांनी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून खंडणी विरोधी पथक याचा तपास करीत आहेत.