BJP Candidate List : भाजपच्या ५० उमेदवारांच्या यादीचा मुहूर्त ठरला! या दिवशी होणार यादी प्रसिद्ध, किती जागा लढणार? जाणून घ्या…


BJP Candidate List :  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत होणार आहे. सध्या या दोन्ही घटक पक्षांच्या बैठका पार पडताना दिसत आहेत.

त्या १० ते १५ दिवसात निवडणूक आयोग यासंबंधी पत्रकार परिषद घेत वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे. दरम्यान भाजप विधानसभेला १६० जागा लढणार असल्याची माहिती मिळत आहे.अद्याप महायुतीत जागावाटप ( निश्चित झालेले नाही.

परंतु भाजपने १६० जागांची तयारी केल्याची माहिती मिळत आहे. घटस्थापना झाल्यानंतर म्हणजेच ३ ऑक्टोबरनंतर भाजपची पहिली यादी जाहीर होऊ शकते. यात ५० उमेदवारांचा समावेश असण्याची चिन्हं आहेत. BJP Candidate List

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युतीत जितक्या जागा लढल्या, तितक्याच जागा लढण्याच्या मानसिकतेत पक्ष आहे. भाजप नेत्यांमध्ये १६४ जागा लढण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली आहे. त्यानुसार कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, भाजप १६० हून अधिक जागा लढणार असल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या वाट्याला मिळून १२५ ते १३० जागा येण्याची शक्यता आहे. यात अन्य घटकपक्षांनाही सामावून घ्यावे लागणार आहेत. अजितदादा ७० जागांवर ठाम आहेत. तर एकनाथ शिंदेही ८० जागांच्या तयारीत आहेत. त्यामुळे जागावाटपावरुन वादंग निर्माण होऊ शकतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!