BJP : विधानसभेच्या तोंडावर भाजपचा नवीन डाव, पक्षाकडून लिफाफा पॅटर्न, इच्छुकांचे टेन्शन वाढले? नेमकं प्रकरण काय?


BJP : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.

पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. पुढील काही दिवसात उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आहे. उमेदवारी बाबत भाजपाकडून वेगळा प्लॅन आखण्यात येत आहे. गोवा आणि बिहार विधानसभा निवडणुकीत राबविलेला ‘लिफाफा’ पॅटर्न आता महाराष्ट्रातही राबवला जात आहे.

भाजपकडून पितृपक्ष संपल्यानंतर विधानसभेच्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांकडून बंद लिफाफ्यात इच्छुक उमेदवारांची नावे मागवून घेतली जातात.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी प्राधान्य क्रमानुसार तीन उमेदवारांची नावे बंद पाकिटातून वरिष्ठांकडे द्यायची आहेत. उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची ही पहिली परीक्षा असल्याचे बोलले जात आहे. BJP

दरम्यान, भाजपचा हा पॅटर्न महाराष्ट्रात कितपत प्रभावी ठरणार, हे बघावे लागेल. आगामी निवडणुकीत भाजपकडून अनेक जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. त्यासाठी विद्यमान आमदारांना डच्चू दिला जाईल. तसे घडल्यास भाजप पक्षसंघटनेत याचे काय पडसाद उमटणार, हे बघावे लागेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!