Bihar : बिहारमध्ये ईबीसी, ओबीसी ६३% नितीशकुमार सरकारचे सर्वेक्षण जाहीर, जातीनिहाय जनगणना करणारे बिहार ठरले देशातील पहिले राज्य

Bihar नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना बिहार सरकारने सोमवारी जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केली आहे. Bihar
जातनिहाय जनगणना करणारे बिहार हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. प्रभारी मुख्य सचिव विवेककुमार सिंह यांनी याबाबत जातनिहाय जनगणना पुस्तिकेचे प्रकाशन केले.
बिहारमध्ये २ कोटी ८३ लाख ४४ हजार १६० कुटुंबे आहेत. यामध्ये मागासवर्गीय लोकसंख्या २७.१२ टक्के, अतिमागास ३६.०१ टक्के, अनुसूचित जाती १९.६५ टक्के, अनुसूचित जमाती १.६८ टक्के आणि सर्वसाधारण प्रवर्ग १५.५२ टक्के आहे.
जनगणना दोन टप्प्यांत..
पहिला टप्पा ७ जानेवारीपासून सुरुवात; घरांची यादी आणि मोजणी. २१ जानेवारी २०२३ रोजी टप्पा पूर्ण.
दुसरा टप्पा १५ एप्रिलपासून सुरुवात; कुटुंबांची संख्या, राहणीमान, उत्पन्न इत्यादी माहितीचे संकलन. दरम्यान, हे प्रकरण न्यायालयात गेले. निकालापर्यंत दुसऱ्या टप्प्याचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण. ४ मे रोजी न्यायालयीन हस्तक्षेपामुळे काम थांबले. पाटणा उच्च न्यायालयाने १ ऑगस्ट रोजी सर्व याचिका फेटाळल्या आणि सरकार जनगणना करू शकते, असा निकाल दिला. जनगणना झाली आहे.
प्रवर्गनिहाय संख्या – अतिमागास – ३६.०१, मागास – २७.१२, अनुसूचित जाती – १९.६५, अनुसूचित जमाती – १.६८ सर्वसाधारण – १५.५२
धर्मनिहाय संख्या : हिंदू ८१.९९, मुस्लिम १७.७, ख्रिश्चन ०.०५७, शीख : ०.०११, बौद्ध ०.०८५, जैन ०.००९ इतर : ०.०१२७ , निधर्मी ०.००१६
बिहारमधील जाती..
कोईरी ४.२, कुर्मी २.८, कायस्थ ०.६०, मोची (रविदास) – ५.२, ब्राह्मण ३.६५, भूमिहार २.८६, मुसहर ३.०८, राजपूत ३.४५, बनिया २.३१, मल्लाह २.६०, यादव १४.२६ (आकडे टक्क्यांत)
लोकांची आर्थिक स्थिती आणि त्यांच्या जातीशी संबंधित माहिती गोळा केलेली आहे. या माहितीचा उपयोग लोककल्याणाच्या योजना आखण्यात होईल.
-नितीश कुमार, मुख्यमंत्री
हा ऐतिहासिक क्षण आहे. अनेक दशकांच्या संघर्षाचे हे फळ आहे. – तेजस्वी यादव, उपमुख्यमंत्री