राजकारणातील सर्वात मोठी बातमी! पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांची बंद दाराआड चर्चा, नेमकं घडतंय काय?

पुणे : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्या अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटांमधील संभाव्य एकत्रिकरणाची चर्चा चांगलीच गाजत आहे. अशातच आज अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. अजित पवारांनी घाई घाईने शरद पवारांच्या दालनात प्रवेश केला.
यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ बंद दाराआड चर्चा झाली. या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार शरद पवारांच्या दालनात शिरल्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. यामुळे यामध्ये काय चर्चा झाली याबाबत माहिती समोर आली नाही.
व्हिडिओमध्ये अजित पवार ‘प्रेसिडेंट’ असं लिहिल्याला खोलीत शिरताना दिसत आहे. घाईघाईत त्यांनी पीएसोबत केलेला संवाद देखील समोर आला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नुकतेच बारामतीतील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाने या चर्चांना अधिक बळ दिले आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांचा एकत्रित मंचावर येणं, तसेच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात झालेला संवाद यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत बदल दिसू शकतो.
आजच्या पुण्यातील कार्यक्रमात व्हिडीओत अजित पवार घाईघाईत चालत येताना दिसत आहेत. आल्यानंतर ते ‘कुठे बसायचं रे’ असं पीएला विचारताना दिसत आहेत. यावर ‘साहेब इकडे आत बसलेत’ असं पीएने सांगितले. नंतर अजित पवार प्रेसिडेंट बोर्ड लावलेल्या दरवाज्यातून आतमध्ये शिरले. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
यानंतर याच दालनात दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. यामुळे आता राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडणार हे लवकरच समजेल. दरम्यान, आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आहे. यावेळी सर्व पक्षातील नेते एकाच मंचावर आले आहे.