अनिल अंबानींना सर्वात मोठा झटका! डायरेक्ट इतक्या हजार कोटींची संपत्ती जप्त, ईडीच्या कारवाईमुळे खळबळ…

नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपवर मोठी कारवाई केली आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आली. यात समूहाच्या तब्बल ३,०८४ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या ४० हून अधिक मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्यात आल्या आहेत.

तसेच मुंबईस्थित वांद्रे येथील पाली हिलचं घर, दिल्लीचं प्रमुख रिलायन्स सेंटर, त्याशिवाय दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई, कांचीपूरम आणि पूर्व गोदावरी सारख्या प्रमुख शहरातील जमिनी, कार्यालयं आणि फ्लॅट जप्त केले आहेत. एकूण मिळून अनिल अंबानी ग्रुपच्या ४० पेक्षा जास्त प्रॉपर्टीवर कारवाई झाली आहे.

ईडीच्या तपासाच्या केंद्रस्थानी रिलायन्स ग्रुपच्या दोन वित्त कंपन्या, रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड आहेत. या कंपन्यांवर सामान्य गुंतवणूकदार आणि बँकांकडून घेतलेल्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. येस बँकेने २०१७ ते २०१९ दरम्यान या कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली होती, जी नंतर बुडीत खात्यात गेली.

या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची यादी मोठी असून, त्यात ४० पेक्षा जास्त मालमत्तांचा समावेश आहे. मुंबईतील वांद्रे येथील पाली हिलमधील निवासस्थान, दिल्लीतील प्रमुख रिलायन्स सेंटर आणि याव्यतिरिक्त नोएडा, गाझियाबाद, पुणे, ठाणे, हैदराबाद व चेन्नई येथील जमिनी, कार्यालये आणि फ्लॅट्स ईडीने तात्पुरते जप्त केले आहेत.
तपासात असेही उघड झाले आहे की, या कंपन्यांनी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्डाच्या नियमांचेही उल्लंघन केले. सर्वसामान्य जनतेचा म्युच्युअल फंडातील पैसा फिरवून, अप्रत्यक्षपणे येस बँकेच्या मार्गाने पुन्हा रिलायन्स ग्रुपच्याच कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आला. ईडीच्या मते, हा निधी वळवण्यासाठी एक पूर्वनियोजित योजना बनवण्यात आली होती.
