हवेलीत उन्नत मार्गांच्या प्रस्तावित कामाच्या पार्श्वभूमीवर ‘पीएमआरडीए’ आयुक्तांचा दौरा; घनकचरा व पिण्याच्या पाण्यासाठी अतिरिक्त ६०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाची आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडून मागणी…


जयदिप जाधव

उरुळीकांचन : पुणे – सोलापूर मार्ग व पुणे – अहिल्यानगर मार्ग या राष्ट्रीय महामार्गावर उभ्या राहणाऱ्या उन्नत मार्गाच्या कामासाठी हडपसर ते यवत तसेच विमाननगर ते शिरुरपर्यंत वाहतुक कोंडीचा निर्माण होणाऱ्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर शिरुर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या पुढाकाराने पुणे क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चे आयुक्त अभिजीत चौधरी यांचा शनिवार (दि. १) रोजी दौरा आयोजित करुन या दोन्ही मार्गावरील अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण करुन वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

हडपसर ते यवत व विमाननगर ते शिरुर हे दोन्ही रस्ते शिरुर-हवेली मतदारसंघातून जात असल्याने या इलिव्हेटेड उड्डानपूलाच्या प्रस्तावित कामामुळे या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर वाहतुककोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी पीएमआरडीए प्रशासनाशी चर्चा करून वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी या राष्ट्रीय महामार्गांलगत अंतर्भूत असलेले रस्ते रुंदीकरण करुन निर्माण होणारी वाहतुक कोंडी या अंतर्गत रस्त्यावरुन वळविण्याची सूचना मांडली आहे.

या उन्नत मार्गाचे चार वर्षकाळात चालणारे काम व राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करुन प्रवासी वाहतुकीच्या समस्येला सर्वाधिक प्राधान्य द्यावे अशी सूचना आयुक्त अभिजित चौधरी यांच्याकडे केली आहे. वाहतुकीसह पूर्व हवेलीत मोठ्या ग्रामपंचायत क्षेत्रात भेडसवणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व घन कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पूर्व हवेलीत ६०० कोटी रुपयांचे घनकचरा व पिण्याचे पाणी स्त्रोत तसेच जलकुंभ शुध्दीकरणासाठी प्रकल्प करुन विकास आराखडा राबवून करण्याचे निर्देश पीएमआरडीए आयुक्त अभिजीत चौधरी यांच्यापुढे मांडले आहे.

दरम्यान हवेलीत यशवंत सहकारी साखर कारखान्याला वाहतुकीसाठी आवश्यक असलेला साष्टे ते थेऊर मुठा नदीवर पुलासाठी प्रस्तावित मंजूरी तसेच न्हावी सांडस ते विठ्ठलवाडी (शिरुर) या पुलासाठी सूचना आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी पीएमआरडीए आयुक्त अभिजीत यांच्यापुढे मांडल्या आहेत.

या दौऱ्यात आव्हाळवाडी, वाडेबोल्हाई, मांजरी खुर्द, थेऊर, प्रयागधाम, कोरेगाव, टाकळी भीमा, सनसवाडी, कोरेगाव भीमा, पिंपळे जगताप, लोणीकंद, भावडी, लोहगाव रस्ता, वाघेश्वर मंदिर परिसर, तुळापूर व बकोरी मार्ग या परिसरांना भेट देऊन वाहतूक कोंडीची कारणे, रस्त्यांची स्थिती, भविष्यातील वाहतूक नियोजन तसेच नागरिकांच्या विविध मागण्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!