पुण्यातील रेव्ह पार्टीतील’ त्या’ तीन मुलींबद्दल पोलीस तपासात मोठा खुलासा


पुणे : पुण्यातील खराडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये शनिवार रात्री सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकला. याप्रकरणी पोलिसांनी पाच पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेतले तर तीन महिला पळून गेल्या. आता याप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली असून त्या तीन महिलांचा पार्टीशी कोणताही संबंध नसल्याचे पोलिस तपासात पुढे आलं आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर आणि प्रसिद्ध बुकी निखिल पोपटा यांच्यासह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.या पार्टीमध्ये आणखी तीन महिलांचा समावेश होता. मात्र, पोलीस येताच त्या महिला तिथून निघून गेल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. पण पोलिस तपासात या महिलांचा या पार्टीशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांची आज पोलीस कोठडी संपणार आहे. आज खेवलकरांना कोर्टात हजर केले जाणार आहे.

या पार्टीतून गांजा, कोकेन आणि दारू पोलिसांनी जप्त केली. रेव्ह पार्टी सुरू असताना पोलिसांनी ही छापेमारी केली. मात्र, यानंतर सतत पुणे पोलिसांवरच गंभीर आरोप केले जात आहेत. पुणे पोलिसांच्या विरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचेही एकनाथ खडसेंनी म्हटले आहे.दरम्यान आज दुपारी पुणे पोलिसांची गुन्हे शाखा प्रांजल खेवलकरांसह इतर चार जणांना न्यायालयात हजर करणार आहे. या प्रकरणात आज प्रांजल खेवलकर यांना दिलासा मिळतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!