रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये? जुलैचा हप्ता रखडल्याने वाढली उत्सुकता; मोठी अपडेट समोर..


पुणे : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. राज्यातील लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.

मात्र, ऑगस्ट महिना संपत आला तरी जुलै महिन्याचा हप्ता अद्याप अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्रितपणे 3,000 रुपये मिळणार का, याकडे आता लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.

रक्षाबंधनानिमित्त 3,000 रुपयांची ओवाळणी मिळणार?

जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये मिळाला होता. मात्र, जुलैचा हप्ता अद्याप प्रलंबित असल्याने रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सरकार दोन महिन्यांचे मिळून 3,000 रुपये देणार का, अशी चर्चा सुरू आहे.

2024 मध्ये रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पात्र महिलांना दोन महिन्यांचे मिळून 3,000 रुपये देण्यात आले होते. त्यामुळे यंदाही त्याच पद्धतीने दोन महिन्यांची रक्कम एकत्रित द्यावी, अशी मागणी काही लाभार्थी महिलांकडून केली जात आहे.

सरकारचा निर्णय अद्याप स्पष्ट नाही

दरम्यान, यंदा जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रितपणे 3,000 रुपये देण्याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.

त्यामुळे लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार की केवळ जुलै महिन्याचे 1,500 रुपये मिळणार, याबाबत सध्या कोणतीही अधिकृत स्पष्टता नाही. सरकारच्या निर्णयानंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!