मोठी बातमी! वाल्मिक कराडला सुदर्शन घुले आणि अन्य कैद्यांची तुरूंगात मारहाण? धक्कादायक माहिती आली समोर..

बीड : येथील सरपंच हत्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराड यांना बीड जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मकोका कायद्याअंतर्गत आरोपी असलेल्या कराड आणि सुदर्शन घुले यांना अन्य कैद्यांनी मारहाण केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.याबाबत तपास सुरू आहे.
आरोपी असलेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे दोघे सध्या बीडच्या कारागृहात कैद आहेत. तसेच संतोष देशमुख हत्याकांडातील इतर आरोपीही त्याच तुरूंगात आहेत. जवळच बॅरेकमध्ये अक्षय आठवले नावाचा आरोपी असून तोही मकोका कायद्याअंतर्गत शिक्षा भोगत आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून आठवले, गीते आणि कराड, घुले यांच्यामध्ये वाद सुरू होता.
याच पार्श्वभूमीवर संबंधित कारागृहात पोलिसांची जादा पोलीस देखील तैनात करण्यात आले होते. आज सकाळी पुन्हा बाचाबाची झाली आणि थोड्याच वेळात ती वाढून त्याचे रुपांतर वादात झाले. अक्षय आठवले, महादेव गीते हे दोघेही सुरूवातील त्यांच्यावर चालून गेले आणि त्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली असे वृत्त सध्या समोर आलं आहे.
इतर सगळे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांच्या अंगावर धावून गेल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत जेल प्रशासनाने अद्याप दुजोरा दिलेला नाही. सुरूवातीला त्यांची बाचाबाची झाली , नंतर त्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
असे असताना मात्र जेल प्रशासनाने यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. दोन गटातले दोन्ही आरोपी आमनेसामने यापूर्वी आले होते. दादा खिंडकर या मारहाणीतील आरोपीनेही अशाच प्रकारचा आरोप केला होता. याबाबत आता प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.