मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची दसरा मेळाव्यातून तोफ धडाडणार, एकनाथ शिंदेंच्या भाषणाकडेही लक्ष, दसरा मेळावा गाजणार?


पुणे : राज्यात दरवर्षी विविध पक्षाकडून दसरा मेळाव्याचे आयोजन केले जातं. त्यामुळे दसरा मेळावाला विशेष महत्त्व प्राप्त झाल आहे. दरवर्षीप्रमाणे आता यंदाही शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा खास ठरणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादरमध्ये याचे आयोजन करण्यात आले आहे.य़ावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलतात आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणती घोषणा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत.दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक वाढल्यानंतर होणारा हा पारंपरिक दसरा मेळावा आहे.. दोन्ही भावांची जवळीक वाढली मात्र राजकीय युतीही होणार का ? यासंदर्भात उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागलं आहे.शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही गट दसरा मेळावे आयोजित करतात. त्याप्रमाणे आज ठाकरेंच्या सेनेचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क येथे होणार आहे.

दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील नेस्को एग्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे होणार आहे. या मेळाव्याची वेळ सायंकाळी 6 वाजता असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदाचा दसरा शेतकऱ्यांच्या बांधावर, स्थळ बदललंय परंपरा नाही, अशी पोस्ट एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या ठिकाणाबद्दल माहिती देताना केली आहे. या मेळाव्यातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर नेते काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!