मोठी बातमी! ट्रॅक्टर थेट विहीरीमध्ये पडल्याने भीषण अपघात, घटनेत सात महिलांचा मृत्यू, उडाली खळबळ..

हिंगोली : येथील एका शेतात शेतमजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर थेट विहीरीमध्ये पडल्याने भीषण अपघात घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आलेगाव शिवारात हा अपघात झाला आहे. यामध्ये आठ मजूर बुडाले असल्याची माहिती समोर येत आहे. साठ फूट विहिरीत टॅक्टर कोसळला असून या विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी देखील होते.
या घटनेत एकूण सात महिलांचा मूत्यू झाला आहे. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी ट्रॅक्टरचालकाने तिथून पळ काढला, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अजूनही आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनेने मोठी खळबळ अडकली आहे.
विहिरीमध्ये ट्रॅक्टर पूर्णपणे बुडाला आहे. ट्रॅक्टर मध्ये नेमके किती जण होते याची माहिती अद्याप पुढे आलेली नाही. प्रत्यक्षदर्शी एका व्यक्तीची पत्नीसुद्धा त्या ट्रॉयलीमध्ये बसलेली होती. नेमका अपघात कशामुळे झाला याबाबतचे कोणतेही कारण समोर आलेले नाही. फरार झालेला ट्रॅक्टरचालक समोर येईल त्यानंतर अपघात होण्याआधी काय घडलं हे समजणार आहे.
वसमत तालुक्यातील गुंज गावातील शेतकरी महिला मजूर होत्या. ट्रॅक्टरमध्ये बसून या महिला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्ट विहिरीत कोसळले आहे. दगडू शिंदे नामक शेत मालका शेतात काम करण्यासाठी वसमत हून मजूर आणण्यात आले होते. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू करत दोन महिलांसह एका पुरुषाला वाचवले आहे. मात्र अद्याप ही सात ते आठ जण विहिरीत बुडाले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली असून हिंगोलीसह नांदेड पोलीस देखील घटनास्थळी आहेत. ते सध्या याबाबत माहिती घेत आहेत.