मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या ऑडिटमध्ये धक्कादायक उलगडा ; तब्बल 26.34 लाख अपात्र लाभार्थी पुरुषाने घेतला लाभ, महिलांना केवायसी बंधनकारक

पुणे : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुती सरकारने महिलांसाठी सुरु केली असातानाही अनेक पुरुषांनी याचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.या योजनेतील गैरप्रकार समोर आले आहेत.हीच कीड दूर करण्यासाठी सरकाने पडताळणीचे निकष आता कठोर केले असून त्याचअंतर्गत आता ई-केवायसी सक्तीची करण्यात आली आहे.मात्र, नुकत्याच झालेल्या ऑडिटमध्ये धक्कादायक बाब उघड झाली. तब्बल 26.34 लाख अपात्र लाभार्थी, ज्यात अनेक पुरुषांचा समावेश आहे, हे देखील लाडकी बहीण या योजनेचा गैरफायदा घेत असल्याचे समोर आले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि अपात्रांना योजनेतून वगळण्यासाठी शासनातर्फे ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली आहे. ग्रामीण व शहरी भागातील सर्व महिलांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. अन्यथा मिळणारी आर्थिक मदत बंद होण्याची शक्यता आहे. तसेच पतीचे किंवा पित्याच आधारकार्डही बंधनकारक करण्यात आले आहे.
सरकारने सर्व पात्र महिलांसाठी ई-केवायसी अनिवार्य केली असून त्यासाठी दोन महिन्यांची मुदत निश्चित केली आहे. ई-केवायसीची ही प्रक्रिया जर ठरावीक वेळेत पूर्ण झाली नाही, तर दरमहा मिळणारी 1500 रुपयांची आर्थिक मदत थांबू शकते.दरम्यान गेल्या वर्षी, जुलै 2024 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. 21 ते 65 वयोगटातील गरजू महिलांना दरमहा 1500 रुपयांची थेट मदत देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
