मोठी बातमी! शरद पवारांचे सर्वात विश्वासू जयंत पाटील यांनी घेतली बावनकुळेंची भेट, राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यामुळे जयंत पाटील लवकरच शरद पवार यांची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जयंत पाटील भाजपात जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यांनी वेळोवेळी नकार दिला आहे.
यापूर्वीच्या काही घटना पाहिल्या तर यापूर्वीही जयंत पाटील यांनी भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. अशी चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळते. जयंत पाटील हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. या भेटीमुळे ही चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. त्यांनी मात्र याबाबत नकार दिला आहे.
जयंत पाटील म्हणाले, मी सांगली येथील महसूल प्रश्नाबाबत बावनकुळे यांची भेट घेतली आहे. माझ्यात आणि बावनकुळे यांच्यात २५ मिनिटं चर्चा झाली आहे. पण, ही भेट राजकीय नव्हती. यावेळी राजकीय चर्चा झाली नाही. भेटी दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील आणि शिष्टमंडळातील नागरिकही उपस्थित होते, यावेळी बावनकुळे यांना १४ निवेदनं दिली.
तसेच व्यक्तिगत कामासाठी ही भेट झाल्याचे बावनकुळे यांनी सांगितले आहे. इतकंच नाही तर भेटीनंतर आपण स्वत: त्यांना निवासस्थानाबाहेर सोडले, असेही बावनकुळे यांनी सांगितले आहे. बावनकुळे यांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती आहे. मात्र ही भेट जास्त वेळ झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. महायुती सरकारमध्ये एक मंत्रिपद रिक्त आहे. ते देखील जयंत पाटील यांच्यासाठी ठेवलं असल्याची चर्चा आहे. यामुळे येणाऱ्या काळात काय राजकीय घडामोडी घडणार हे लवकरच समजेल.