मोठी बातमी! रावसाहेब दानवे यांच्या गाडीला लोणावळ्यात भीषण अपघात…


लोणावळा : भाजपने बडे नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वाहनाला लोणावळ्यातील जयचंद चौक परिसरात एका दुचाकीने जोरदार धडक दिली. यामुळे मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर वाद देखील झाल्याची माहिती आहे. दुचाकीस्वार आणि दानवे यांच्यात वाद झाला. घटनास्थळी काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी, या घटनेने सार्वजनिक सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी पोलिस व नगरपालिका प्रशासनाकडे लवकरात लवकर सीसीटीव्ही यंत्रणेची दुरुस्ती करून ती कार्यरत करण्याची मागणी केली आहे. स्थानिक रिक्षाचालकांनी प्रसंगात हस्तक्षेप करत दोघांनाही शांत केलं.

याठिकाणी सीसीटीव्ही बंद असल्याचे दिसून आले आहे. अशा महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचे सीसीटीव्ही बंद असणे ही गंभीर बाब आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे अनेकांनी सांगितले. या घटनेत गाड्यांचेनुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, दुचाकीस्वाराने अचानक रस्त्यात चुकीच्या दिशेने गाडी चालवत येत कारला धडक दिली, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. जयचंद चौक ही परिसरातील एक गजबजलेली आणि महत्त्वाची जागा असूनही येथे पोलिसांचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!