मोठी बातमी! पुण्यात आयकर रिटर्न घोटाळा ; तब्बल 500 कोटी लंपास.. आयटी,मल्टिनॅशनल कंपनीचे कर्मचारी गोत्यात..


पुणे : पुण्यामध्ये भला मोठा आयकर रिटर्न घोटाळा उघडकीस आला आहे. आता आयकर विभाग आयटी इंजिनियर, ऑटोमोबाईल किंवा अन्य खाजगी मल्टिनॅशनल कंपनीच्या या हजारो कर्मचाऱ्यांना शोधत आहे.सुमारे 500 कोटी रुपयांचा हा टॅक्स रिफंडचा घोटाळा असून पुण्यातील बहुतांशी खाजगी कर्मचारी यामुळे गोत्यात आले आहेत

पुण्यातील आयकर संचालनालयान हे मोठं घबाड उघडकीस आणलं आहे हा घोटाळा व्यावसायिकांच्या एका टोळीद्वारे केला जात होता, जे स्वतःला आयकर रिफंड एक्सपर्ट म्हणवून लोकांची फसवणूक करत होते. ही टोळी पाच वर्षांहून अधिक काळ कार्यरत होती आणि त्यांच्याकडून 10,000 हून अधिक आयकर विवरणपत्रे दाखल केल्यास तपासात उघडकीस आले आहे. त्यांचे लक्ष्य बहुतेक खाजगी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणारे पगारदार कर्मचारी होते. या टोळीने नोकरदारांना त्यांच्या उत्पन्नावर कर परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने हजारो लोकांचे आयकर भरले आणि त्यांना ती परत मिळवून दिले आहेत.

दरम्यान या टोळीने आयकर रिटर्न भरण्यातील त्रुटींचा फायदा घेत 500 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली. गेल्या पाच वर्षांत या व्यावसायिकांनी 10 हजारांहून अधिक बनावट आयकर रिटर्न दाखल केल्याचे सांगण्यात येत असून आता आयकर विभागाची एक शाखा, आयकर संचालनालय (तपास) या प्रकरणाची चौकशी करत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!