मोठी बातमी!बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ तारखेपासून हॉल तिकीट उपलब्ध होणार


पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठीची बोर्डाकडूनची तयारी पूर्ण झाली आहे. आता विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेसाठीचे हॉल तिकीट येत्या 12 जानेवारीपासून ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

बारावीची परीक्षा फेब्रुवारीत सुरु होणार आहे. त्यासाठी एक महिनाभर आधी म्हणजे १२ जानेवारीपासून हॉल तिकीट दिले जाणार आहे. परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर सोमवारपासून उपलब्ध होणार आहेत, याबाबत राज्य मंडळाचे सचिव माळी यांनी माहिती दिली आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये असेही म्हणणे स्पष्ट केले आहे.

परीक्षेच्या हॉल तिकीटची प्रिंट काढल्यानंतर प्रवेश पत्रावर फोटो असल्यावर त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे. यानंतरच हॉल तिकीट ग्राह्य धरले जाईल. बारावीची परीक्षा ही १० फेब्रुवारी ते १८ मार्च रोजी होणार आहे. या कालावधीत परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांकडे हॉल तिकीट असणे अनिवार्य आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!