सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! आठव्या वेतन आयोगामुळे पगारात दुप्पट वाढ होणार? नवीन अपडेट

पुणे : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारी,कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे डोळे आठव्या वेतन आयोगाकडे लागले आहेत. या आठव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये पगार आणि पेन्शन मध्ये वाढ होण्याची आशा निर्माण झाली आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दुप्पट होऊ शकतो. कर्मचाऱ्यांचा पगार फिटमेंट फॅक्टरनुसार वाढतो अशी माहिती समोर आली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग जानेवारी २०२६ पासून लागू झाला आहे. परंतु पगारवाढ येण्यास अजून उशिर होणार आहे. दरम्यान, आता या नवीन वेतन आयोगानुसार पगार कितीने वाढणार असा प्रश्न कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पडला आहे. दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
काय असतो हा फिटमेंट फॅक्टर?

सरकारी कर्मचाऱ्यांचा सुधारित पगार काढण्यासाठी साध सुत्र वापरले जाते. तुमच्या विद्यमान मूळ वेतनाला फिटमेंट फॅक्टरने गुणले की नवीन मूळ वेतन मिळते. हा फॅक्टर जेवढा जास्त तेवढी पगार वाढ मोठी मिळते.
सध्या सुरु असलेल्या चर्चांनुसार, आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा दुप्पट होऊ शकतो. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.