मोठी बातमी! पुण्यात बसचे ब्रेक फेल, अनेक गाड्यांना चिरडले, अनेकजण जखमी…


पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील चांदणी चौकात पीएमपीएमएल बसचे ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाला. दुचाकी आणि अन्य वाहनांना धडक दिल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. अचानक घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, चांदणी चौकातून पुणे शहराच्या दिशेने येत असताना पीएमपीएमएल बसचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे मोठा अपघात घडला. या बसने ५ ते ६ दुचाकी, एक रिक्षा आणि काही अन्य वाहनांना धडक दिली. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे.

दरम्यान, या अपघातात ४ जण जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेनंतर मुंबईतील कुर्ला अपघाताची पुनरावृत्ती झाल्याचे म्हटले जात आहे. या घटनेने मोठी गर्दी झाली होती. मुंबईतील बेस्ट बसने अनेक गाड्यांना धडक दिली होती.

या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला. तर ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यानंतर आता पुण्यातील चांदणी चौकात पीएमपीएमएल बसचे ब्रेक फेल झाले. या बसने ५ ते ६ दुचाकी, एक रिक्षा आणि काही अन्य वाहनांना धडक दिली. या अपघातात ४ ते ५ जण जखमी झाले.

सीसीटीव्हीत ही सर्व घटना कैद झाली आहे. या व्हीडीओत चांदणी चौक परिसर पाहायला मिळत आहे. त्यात एक निळ्या रंगाची पीएमपीएमएल बस आली. त्या बसने सुरुवातीला एका दुचाकीला धडक दिली असल्याचे दिसून येत आहे. याबाबत पोलीस सध्या तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!