मोठी बातमी! लाडक्या बहिणींपुढे पुन्हा संकट ; ई- केवायसी करणे बंधनकारक, कशी करणार ही प्रक्रिया?

पुणे : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आणण्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली.गेल्या वर्षी ऑगस्ट 2024 मध्ये मोठ्या दणक्यात ही योजना सुरु करण्यात आली. लाडकी बहीण योजनेतील बोगसगिरीला चाप लावण्यासाठी सरकार अलर्ट मोडवर आले आहे. आता सरकारने ईकेवायसी अनिवार्य केली आहे. त्यामुळे काही लाडक्या बहिणींना सुद्धा फटका बसण्याची शक्यता आहे.

कशी करणार ही प्रक्रिया?
1. महिलांना सीएससी सेंटरवरून अथवा स्वतः ऑनलाईन पद्धतीने ई-केवायसी करता येईल. त्यासाठी अत्यावश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

2.या योजनेच्या ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

3.या प्रक्रियेत लाभार्थी महिलेचे नाव, पत्ता, आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाची माहिती भरावी लागेल.
4.ही प्रक्रिया लवकरच सुरू होईल. त्यासाठी संकेतस्थळावर लवकरच पॉपअप विंडो सुरू होण्याची शक्यता आहे.
5.ही प्रक्रिया सोपी आहे. जसे ही प्रक्रिया सुरू होईल. तशी ईकेवायसी पूर्ण करा. नाहीतर नंतर गर्दी उसळेल आणि साईटवरी ताण येईल
6.पुढील मनस्ताप टाळण्यासाठी आणि योजनेचा हप्ता सुरू राहण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया लवकर पूर्ण करा.
लाडकी बहीण योजनेविषयी सरकार दरबारी नवीन निर्णय घेण्यात आला आहे. आता प्रत्येक लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याविषयीची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.