मोठी बातमी! नवले ब्रिजवर पुन्हा अपघात, ट्रेलरचा ब्रेक फेल, एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?


पुणे : आज पुण्यातून अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील नवले ब्रिजवर अपघातांची मालिका सुरूच आहे. याठिकाणी ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने तीन वाहनांना जोरदार धडक बसली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात वाहनांच्या पुढचा भाग चकनाचूर झाला आहे. घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. याठिकाणी वाहनांची गती, वाहतूक नियमनाची कमतरता आणि उताराचा रस्ता हे सर्व घटक वारंवार होणाऱ्या दुर्घटनांना कारणीभूत ठरत आहेत.

स्थानिक नागरिकांनी या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे. या अपघातानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. सध्या अपघातग्रस्त वाहनं बाजूला करण्याचे काम सुरू असून, अधिक तपास सुरू आहे.

नवले ब्रिजवर याआधीही अनेक वेळा अशा प्रकारचे अपघात घडले आहेत. यामुळे याठिकाणी गतिरोधक करून अनेक उपाय योजना कराव्या लागणार आहेत. यामुळे याबाबत मागणी केली जात आहे. याबाबत प्रशासनाने निर्णय घेणे गरजेचे आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!