मोठी बातमी! ठाकरे गटाच्या बड्या नेत्याने केली आत्महत्या, राजकीय वर्तुळात खळबळ..


मुंबई : मुंबई घाटकोपर परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी केली आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, ठाकरे गटाचे नेते माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी घाटकोपर आणि विद्याविहार रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेखाली उडी घेत आपलं जीवन संपवले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे कारण अजूनही स्पष्ट होऊ शकले नाही. कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे.

परंतु सुधीर मोरे यांनी इतक्या टोकाचा निर्णय का घेतला असावा? असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला खूप मोठा धक्का बसला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!