सोन्याच्या दरावर मोठा परिणाम, कारण ठरलं अमेरिका आणि चीन, अक्षय्य तृतीयेआधी मोठा बदल…

पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.
प्रति तोळा १ लाख रुपये असा दर गाठणाऱ्या सोन्याच्या किमतीत मागील काही दिवसांपासून घसरण सुरू असल्याचे दिसत आहे. अमेरिका-चीनमुळे सोन्याच्या दरावर परिणाम होत आहे. आता अक्षय्य तृतीयेआधी मोठी अपडेट आली आहे.
तसेच आज सोन्याच्या किमतीत अचानक मोठी घसरण झाली. सोन्यासोबतच चांदीही आता स्वस्त झाली आहे. एमसीएक्सवर 5 जून 2025 रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 0.07 टक्क्यांनी स्वस्त होऊन तो 94,926 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
5 मे 2O25 च्या डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 0.45 टक्क्यांनी घसरून 96,011 रुपये प्रति किलो झाला. यापूर्वी 22 एप्रिल रोजी सोन्याचा दर 1 लाख रुपये प्रति 1O ग्रॅम या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता, परंतु आज त्यात मोठी घसरण झाली आहे.
दरम्यान, अक्षय तृतीयेच्या दोन दिवसआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण दिसून येत आहे. रिटेल मार्केटमध्ये सोन्याचे दर 1500 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. 24 कॅरेट सोन्याचे दर हा 97 हजार 183 प्रति तोळा इतका झाला आहे. 23 कॅरेट सोन्याचे दर 93 हजार 425 प्रति तोळा इतका झाला आहे. 22 कॅरेट सोन्याचे दर 89 हजार 345 रुपये, 20 कॅरेट सोन्याचा दर 81 हजार 224 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर हा 73 हजार 100 प्रति तोळा इतका झाला आहे.