राज्यातील गोविंदांना सरकारकडून मोठं गिफ्ट, विम्यासाठी १८ लाख ७५ हजारांची रक्कम मंजूर…

मुंबई : गोविंदांच्या विम्यासाठी १८ लाख ७५ हजारांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत ही शासकीय विमा कवच योजना लागू राहणार आहे. गोविंदांसाठी राज्य सरकारनं घेतलेला हा सर्वात मोठा निर्णय आहे.
गेल्या वर्षी गोविंदा आणि गोविंदा पथकांसंदर्भात राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यापैकी काही निर्णयांची आता राज्य सरकारकडून अंमलबजावणी होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
दहीहंडी जवळ आली असून राज्यभरात दहीहंडीसाठी गोविंदा पथकांची जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. गोविंदा पथकांचा सरावही जोरात सुरू आहे. अशातच गोविंदांसाठी राज्य सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचलत मोठी घोषणा केली आहे.
गोविंदांसाठी राज्य सरकारनं १८ लाख ७५ हजारांची विमा कवच योजना जाहीर केली आहे. ही योजना ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत लागू राहणार आहे. यासंदर्भातील सर्व प्रक्रियांना मंजूरी देत शासकीय आदेश काढून राज्य सरकारनं यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
गेल्यावर्षी ५० हजार गोविंदांना राज्य सरकारकडून शासकीय विमा कवच देण्यात आले होते. पण आता ही संख्या वाढवून ७५ हजारांपर्यंत करण्यात आली आहे.
म्हणजेच, राज्यभरातील ७५ हजार गोविंदांना शासकीय विमा कवच देण्याचे आदेश जारी केले आहेत. गेल्यावर्षीपेक्षा आणखी अतिरिक्त २५ हजार गोविंदांना राज्य सरकारने विमा कवच दिले आहे.