नवीन वर्षात एसटी महामंडळाचा मोठा निर्णय!! आता एसटी कुठवर आलीय? तुमच्या मोबाईलवर पाहा, जाणून घ्या कसं?

पुणे : आपल्या एसटी महामंडळाचे राज्यभर जाळे पसरलेले आहे. लाखो प्रवासी रोज एसटीने प्रवास करत असतात. ग्रामीण भागात एसटीही दळणवळणाचे मुख्य साधन आहे. अनेकांची सकाळ ही एसटीच्या प्रवासानेच होते. पण एसटी अनेकदा वेळेमुळे चुकते. ती नेमकं कुठपर्यंत आली आहे, याचा अंदाज कोणाला लावता येत नाही.
यामुळे प्रवासी हा प्रवास टाळतात. त्यांना एसटीची वाट पाहत थांबावे लागते. आता तर विविध योजनांमुळे जाईन तर एसटीनेच, असा आग्रह ज्येष्ठ नागरिकांसह महिला प्रवासी धरतात. त्यांच्यासाठी आता परिवहन महामंडळाने नवीन वर्षात मोठं गिफ्ट दिले आहे. आता एसटी बस कुठंपर्यंत आली आहे, हे प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर पाहता येणार आहे. यामुळे अनेकांची चांगली सोय झाली आहे.
राज्यात एसटीच्या दररोज 50 हजार मार्गावर जवळपास सव्वालाख फेऱ्या होतात. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आगाऊ तिकीट काढूनही मनस्ताप सहन करावा लागतो. त्यांना वेळेवर पोहचूनही एसटीची वाट पाहावी लागते. त्यांना एसटी किती वेळात येणार, आता बस कुठे आहे, याची कोणतीही माहिती मिळत नाही. यावर आता एसटी महामंडळाने उपाय काढला आहे
आता एसटी प्रवाशांच्या सोयीसाठी व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम ॲप आणले आहे. VLT च्या माध्यमातून प्रवाशांना एसटीचे थांबे, बस स्थानकात बस किती वाजता येणार हे 24 तास अगोदर कळेल. या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना एसटीचे लोकेशन मोबाईलवर कळेल. त्यासाठी एसटी तिकिटावरील क्रमांकाच्या माध्यमातून प्रवाशांना बस स्थानकात एसटी किती वाजता येणार हे कळेल. यामुळे याचा फायदा होणार आहे.
एसटीच्या ताफ्यातील सर्वच बसेसला व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम बसवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना या ॲपच्या माध्यमातून बसची सध्यस्थिती, लोकेशन कळेल. यामुळे येणाऱ्या काळात हे उपयुक्त ठरेल. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.