नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेमार्गाच्या कामाबाबत मोठा निर्णय! सर्वेक्षणास मिळाली मान्यता, खासदार लंके यांच्या प्रयत्नाला यश…


पुणे : सध्या नगर ते पुणे दरम्यान नियमितपणे ये-जा करणारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे या मार्गात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. या प्रवाशांना रस्त्याने प्रवास करताना विशेषतः प्रचंड वाहतूक कोंडी आणि बसेसमध्ये जास्त गर्दी यामुळे मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो.

या समस्या सोडविण्यासाठी नगर ते पुणे दरम्यान इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करणे आवष्यक असल्याचे खा. लंके यांनी संसदेत बोलताना स्पष्ट केले होते. असे असताना आता याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नगर-पुणे या१२५ किलोमिटर अंतराच्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिल्याची माहीती खासदार नीलेश लंके यांनी दिली.

याबाबत लंके यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. यामुळे आता कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. नगर-पुणे इंटरसिटी सेवा सुरू झाल्यास दोन्ही शहरांमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या विविध श्रेणीतील प्रवशांना फायदा होईल.

नगर परिसरातील अनेक व्यापारी पुण्यातून माल खरेदी करतात आणि त्यांच्या मालाची वाहतूक करण्यासाठी या सेवेचा वापर करू शकतात. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत लोकांकडून देखील मागणी केली जात होती. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

नगर-पुणे इंटरसिटी ट्रेन ट्रायल आणि रन तत्वावर सुरू करण्यात यावी अशी मागणी खासदार लंके यांनी संसदेमध्ये केली होती. याला आता रेल्वे विभागाकडून प्रतिसाद दिला आहे. याठिकाणी माल वाहतूक, बोगी वाहतुकीच्या उद्देशाने रेल्वेला जोडल्यास त्यातून रेल्वेस उत्पन्न मिळले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!