सावधान! राज्यावर मोठं संकट, मोठा इशारा, पुढील २४ तास अत्यंत धोक्याचे, ६ राज्यामध्ये अलर्ट जारी..


पुणे : राज्यात आणि देशभरात हवामानाने अक्षरशः पलटी मारली आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला पावसाने झोडपल्यानंतर आता कडाक्याच्या थंडीची चाहूल लागली आहे. भारतीय हवामान विभागाने १२ आणि १३ नोव्हेंबरसाठी मोठ्या थंडीचा आणि पावसाचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रासह देशातील सहा राज्यांमध्ये पुढील २४ तास हवामानात मोठा बदल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात थंडीची लाट आलेली असतानाच काही भागात पावसाचाही इशारा भारतीय हवामान विभागाने दिला. पावसाचे ढग देशावर कायम आहेत.

केरळच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. थंडी पुढील काही दिवसांमध्ये अधिक वाढण्याची शक्यता आहे. धुळे, जळगाव, निफाड, नााशिक, परभणी, जेऊर येथे थंडी अधिक वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात आज हलका ते मध्यम स्वरूपाची पाऊस होईल.

       

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सायंकाळी थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. पुण्यात आता १३.४ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानाच्या पाऱ्यात सातत्याने घट होऊ लागल्याने राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे.

पुढील काही दिवसांत राज्यातील किमान तापमानाच्या पाऱ्यात ४ ते ५ अंशांची घसरण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात हवामानात बदल होऊ लागला आहे.

१२ आणि १३ नोव्हेंबर रोजी राज्यातील काही भागांत थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे पुढील काही दिवस नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. थंडीचा जोर सातत्याने वाढताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!