अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं- चांदीच्या दरात मोठा बदल, वाचा तुमच्या शहरातील नवीन दर….

मुंबई : अक्षय्य तृतीया 30 एप्रिल रोजी असून या दिवशी लोक सोने आणि चांदी खरेदी करणे शुभ मानतात. हा दिवस सुख-समृद्धी घेऊन येतो असा समज आहे. म्हणून या दिवशी सोने खरेदी करणे शुभ आहे. यामुळे यादिवशी मोठी गर्दी दुकानांमध्ये गर्दी बघायला मिळते. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा मोठा बदल झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती घसरणपंथीला आला असून आता सोने खरेदीचा दिवस म्हणजे अक्षय्य तृतीयेच्या एक दिवसाआधी सोन्याचा भाव पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात खाली उतरला आहे. अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस आधी भारतात सोन्याच्या किमती घसरल्या आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यामध्ये देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर 700 रुपयांनी घसरले. तसेच चांदीच्या किमतीतही मोठी घसरण दिसून येत आहे. MCX वर जून सोन्याचा वायदा भाव 750 रुपयांनी कमी होऊन प्रति 10 ग्रॅम 95,277 रुपयांवर घसरला आहे.
सोन्याचा विक्रमी उच्चांक प्रति 10 ग्रॅम 99,357 रुपये आहे. तसेच चांदीच्या किमतीही सुमारे 200 रुपयांची घट झाली आहे. मे महिन्याचा चांदीचा वायदा 96,245 रुपये प्रति किलो तर, चांदीची सर्वकालीन उच्च किंमत 1,04,072 रुपये प्रति किलो आहे.
परदेशी बाजारातही सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. सराफा बाजार अमेरिका आणि चीनमधील व्यापार विकास आणि आर्थिक डेटावर लक्ष ठेवून आहे. तसेच चांदीचा भावही प्रति औंस $33 च्या खाली आला असून गुंतवणूकदार आता अमेरिकेच्या डेटावर लक्ष ठेवून आहेत, ज्यामुळे फेड व्याजदरांवर कोणता निर्णय घेईल याबाबत चित्र स्पष्ट होईल.