रमी सर्कल गेममध्ये झाला कंगाल, कर्जाचा डोंगर झाल्यावर तरुणाने घेतला टोकाचा निर्णय…


मुंबई : ऑनलाइन गेम खेळून अनेक जण पैसे कमावण्याचा मार्ग निवडतात. परंतु, यामध्ये खूप आर्थिक जोखीम असते. प्रत्येक वेळी यातून निश्चित परतावा येईलच असे नाही. अनेकजण ऑनलाइन गेम खेळून कर्जबाजारी झाले आहेत.

सध्या असेच एक प्रकरण समोर आले आहे. एका तरुण ऑनलाइन रमी सर्कल गेम खेळून कर्जबाजारी झाला आहे. परंतु हे कर्ज फेडण्यासाठी त्याने टोकाचा निर्णय घेतला आहे.

डोक्यावर असणारे कर्ज फेडण्यासाठी या तरुणाने चक्क एका वयोवृद्ध महिलेला लुटले आहे. नितीन ठाकरे असे या तरुणाचे नाव असून त्याला डोंबिवलीतील विष्णू नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

७० वर्षीय वयोवृद्ध महिला डोंबिवली पश्चिमेतील गांधी उद्यान परिसरामध्ये असणाऱ्या रेल्वे पुलाच्या जिन्यातून डोंबिवली पूर्वेकडे येत होत्या. त्यावेळी आरोपीने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला.

हा सर्व प्रकार त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या एका तरुणाने पाहिला. त्याने पाठलाग करून त्या आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. परंतु, या संपूर्ण प्रकरणानंतर पुन्हा एकदा ऑनलाइन गेमचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!