आंबा खात असाल तर सावध व्हा, अन्यथा होईल विषबाधा, धक्कादायक प्रकार आलाय समोर…


मुंबई : आंबा हा फळांचा राजा आहे. या फळापासून अनेक खाद्यपदार्थ देखील बनवले जातात. अनेकजण सुट्टीच्या काळामध्ये आंब्यापासून बनवलेल्या पदार्थांचा मनमुरादपणे आनंद लुटतात. मात्र आंबे खात असाल तर एक काळजी घेणं गरजेची आहे.

आंब्याची निर्मिती होण्यापासून ते आंबा पिकेपर्यंत आंब्याला कृत्रिमरित्या पिकवलं जातं. यामुळे आंब्याचे सेवन करणाऱ्याला मोठा धोका निर्माण होतो. यामुळे कृत्रिमरित्या पिकवलेल्या फळांमध्ये कॅल्शिअम कार्बाईडचे अधिक प्रमाण होते.

यामुळे अनेकदा तज्ञ आंबे खाताना काळजी घेण्याबाबत सांगत असतात अन्यथा विषबाधा होण्याची भिती असते. आंबे खाताना निष्काळजीपणा करू नका. विशेषत: पिकलेले आंब्यांचा आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो.

इतर फळांची काळजी घेणं गरजेचं आहे. बहुतेक फळे पिकवण्यासाठी तांत्रिक पद्धतीचा वापर केला जातो. कॅल्शियम कार्बाइड नावाचे रसायन वापरले जाते. हे धोकादायक असून मानवी आरोग्यासाठी घातक मानलं जातं.

फळं पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर वाढला आहे. यामुळे अनेक प्रकारचे आजारही वाढले आहेत. कॅल्शियम कार्बाइड पाण्यात मिसळल्यावर त्यातून ॲसिटिलीन वायू बाहेर पडतो. ऍसिटिलीन वायूमुळे फळे पिकण्यास मदत होते.

मात्र ऍसिटिलीन वायू आरोग्यास हानिकारक आहे. यामुळे कॅल्शिअम कार्बाइडने शिजवलेली फळे खाल्ल्याने विषबाधा होण्याचा धोका निर्माण होतो. यामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढू शकतो.

फळ उत्पादन उद्योगातील कामगार जे कॅल्शियम कार्बाइडच्या जास्त संपर्कात असतात त्यांना अधिक गंभीर आरोग्याच्या समस्यांचा धोका असतो. फुफ्फुसातील सूज, कर्करोग सारख्या आजारांचा सामना करावा लागतो. तसेच ॲसिटिलीन वायूमुळे काहींना श्वास घेण्याचा त्रास होतो.

दरम्यान, एखादे फळ खाण्यासाठी आधी अर्धा तास पाण्यामध्ये ठेवावं. पाण्यातून हे फळ बाहेर काढल्यास ते स्वच्छ धुवावं. त्यानंतर फळांचं सेवन करावं, असं आरोग्य तज्ञांचं म्हणणं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!