सावधान!! मेसेजवर क्लिक करताच शेतकऱ्यांचे पैसे गायब, नेमकं घडलं काय?


अहिल्यानगर : केंद्र सरकारकडून २४ फेब्रुवारीला पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या १९ व्या हप्त्याचे २००० रुपये जमा करण्यात आले आहेत. देशभरातील ९.७० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकारच्या कृषी व ग्रामीण विकास विभागाकडून २१५०० कोटींपेक्षा अधिक निधी वर्ग करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा निधी मिळाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील ५ लाख ४१ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. जिल्हा कृषी अधीक्षकांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

दरम्यान, १९ व्या हप्त्याचे २००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होताच सायबर गुन्हेगार सक्रिय झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांना फसवणूक करणारे मेसेज आणि बनावट लिंक पाठवल्या जात असून, त्यावर क्लिक करताच त्यांचे बँक खाते रिकामे होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील ५,४१,००० शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता मिळाला असून, एकूण १०८.३३ कोटी रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र, काही शेतकऱ्यांना निधी मिळालेला नाही. त्याची प्रमुख कारणे ई-केवायसी, जमीन पडताळणी अपूर्ण असणे किंवा डीबीटी सक्रिय नसणे अशी आहेत.

मात्र सध्या PM Kisan.apk, PM Kisan List.apk अशा नावाने बनावट फाईल्स व्हाट्सअ‍ॅपवर फिरत आहेत. अनेक शेतकरी हे अ‍ॅप डाउनलोड करताच त्यांचे बँक खाते रिकामे होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी PM Kisan साठी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि बनावट अ‍ॅप्स डाऊनलोड करू नका. असे आवाहन करण्यात आला आहे.

ई-केवायसी कशी करावी?, जाणून घ्या..

PM Kisan चे अधिकृत अ‍ॅप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा.
लॉगिन करून ‘लाभार्थी’ पर्याय निवडा.
आधार क्रमांक टाका आणि स्कॅन फेसिंगचा पर्याय निवडा.
ई-केवायसी २४ तासांत पूर्ण होईल.
CSC केंद्रावर जाऊनही ई-केवायसी करू शकता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!