काळजी घ्या! देशावर संकट, १०, ११ आणि १२ तारखेला मोठा इशारा; अलर्ट जारी…

पुणे : मागील काही दिवसांपासून देशातील वातावरण सतत बदलताना दिसत आहे. सध्या काही भागात कडाक्याची थंडी आहे तर काही ठिकाणी अजूनही मुसळधार पाऊस पडताना दिसतोय. नुकताच भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला असून विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल.

एकीकडे काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर दुसरीकडे उत्तर व मध्य भारतात तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मोंथा चक्रीवादळामुळे पाऊस होत असल्याचे सुरूवातीला सांगितले गेले. मात्र, आता नोव्हेंबरची १० तारीख असतानाही सतत पाऊस सुरू आहे.

राज्यात काही भागात गारठा आहे. जेऊर आणि धुळ्यात थंडीची लाट आली. किमान तापमान १० अंशांच्या खाली गेले. बंगालच्या उपसागरात ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. पहाटे गारठा अधिक अनुभवायला मिळतंय. मात्र, असे असले तरीही पावसाचे ढग अजूनही कायम आहेत.

याचबरोबर, बंगालच्या उपसागरात ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असून, याचा परिणाम देशाच्या मध्य भागातही जाणवतो आहे. दरम्यान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि दक्षिण हरियाणामध्ये १० व ११ नोव्हेंबरला थंडीची तीव्र लाट येण्याचा अंदाज आहे. या भागात रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा ४ ते ७ अंश सेल्सिअसने कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातही हिवाळ्याची चाहूल लागली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील तापमान २ ते ४ अंशांनी खाली येईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. धुळे, जळगाव , आणि जेऊर या भागात किमान तापमान १० अंशांखाली गेले आहे. महाबळेश्वरपेक्षा जळगाव थंड झाल्याचे चित्र आहे.
हिमालयात झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील तापमानात मोठी घट झाली आहे. मुंबईत रविवारी १९ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले – हा या मोसमातील आतापर्यंतचा सर्वात नीचांक आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरात आठवडाभर सुखद गारव्याचा अनुभव मिळणार आहे.
