Baramati : मोठी बातमी! बारामतीत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून, घटनेने उडाली खळबळ..
Baramati : पुणे शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख वाढता आलेख सुरुच असताना आता बारामतीमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या आवारामध्ये एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ही घटना सोमवारी (ता. ३०) सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे. बारामतीत झालेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. हा खून कोणत्या कारणातून करण्यात आला याबाबत अजून माहिती मिळालेली नाही.
सविस्तर माहिती अशी की, दोन्ही विद्यार्थी याच महाविद्यालयात शिकत आहेत. या दोघांमध्ये एका कारणावरून मारहाण सुरू झाली. मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर आणखी एक विद्यार्थी आला आणि या विद्यार्थ्याला मारत महाविद्यालयाच्या आवारात आणले आणि त्याच्यावर कोयत्याने वार केला.यात हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आणि त्याचा यामध्ये जागीच जीव गेला. Baramati
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने महाविद्यालय परिसरात व दवाखान्याचे ठिकाणी जाऊन पाहणी केली. मुलांमधील वाढता हिंसकपणा अत्यंत धक्कादायक असून या घटनेने बारामती हादरली आहे.