Baramati Lok Sabha : बारामतीमध्ये पैशांचा पाऊस! पोलिस ‘बंदोबस्तात’ मतदारांना वाटले पैसे, रोहित पवारांचे गंभीर आरोप…

Baramati Lok Sabha : बारामतीत विरोधकांकडून मतदाराना पैसे वाटल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बारामतीचे शहराध्यक्ष यांनी केला आहे. रोहित पवार यांनी ट्विटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस बंदोबस्तात मतदारांना पैसे वाट्ल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी याबाबत ट्विटरवर व्हिडीओ देखील शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “बारामती मतदारसंघात चक्क पोलिस ‘बंदोबस्तात’ पडतोय पैशांचा पाऊस…
यासंदर्भात भोर तालुक्यातील काही व्हिडिओ शेअर करतोय… यामध्ये भोर तालुक्यातील ‘अजितदादा मित्रमंडळा’चा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्तेही दिसतायेत… यासाठीच पाहीजे होती का ‘Y’ दर्जाची सुरक्षा”? असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. Baramati Lok Sabha
दरम्यान, भोर तालुक्यातील हे व्हिडीओ असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्याचबरोबर हे पैसे वाटण्यात अजितदादा मित्रमंडळ पदाधिकारी आणि मावळ तालुक्यातील कार्यकर्ते असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. दरम्यान, रोहित पवार यांच्या या आरोपानंतर अजित पवार काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. या ठिकाणी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी काटे की टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे. या निकालाकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागणार आहे.