Baramati : मंदिराच्या चाव्या पुजाऱ्याच्या हातात गेल्यानं…, शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवरून अजितदादांना टोला

Baramati : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्ताने बारामतीमध्ये शरद पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव करणारे बॅनर्स लागलेले आहेत. परंतु अनेक बॅनरचे अजित पवारांना खोचक टोला लगावणारे आहेत.

या बॅनरच्या माध्यमातून शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना चांगलाच चिमटा काढला आहे. या बॅनरबाजीची सद्या जोरात चर्चा सुरु आहे. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत बॅनरबाजी करण्यात आल्याचे समोर आले आहे.
या बॅनरवर मंदिराच्या चाव्या पुजाराच्या हातात गेल्याने, विठ्ठलाचे महत्व कमी होत नाही, अशा आशयाचा मजकूर छापण्यात आला आहार. या बॅनरच्या माध्यमातून शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना चिमटा काढला आहे. Baramati

अजित पवारांनी अनेक आमदारांसह बंडखोरी करत राष्ट्रवादीवर दावा सांगितला होता. या दाव्यानंतर निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीत अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह बहाल करण्यात आलं होतं. तर शरद पवार यांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतारी हे चिन्ह देण्यात आलं होते. या पक्ष आणि चिन्हावर दोन्ही नेत्यांकडून निवडणूक देखील लढवली होती.

त्यामुळे विधानसभेत अजित पवारांनी ४१ जागा जिंकल्या होत्या. तर शरद पवारांना अवघ्या १० जागाच जिंकता आल्या होत्या. त्यामुळेच बॅनरवर “मंदिराच्या चाव्या पुजाराच्या हातात गेल्याने, विठ्ठलाचे महत्व कमी होत नाही” असा मजकूर लिहत अजित पवारांना डिवचण्यात आले आहे.