Baramati Accident News : चारचाकी गाडीने अंध महिलेला चिरडले, बारामतीतील धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद…

Baramati Accident News बारामती : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात अपघाताच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. दरम्यान, दोन दिवसापूर्वी बारामती शहरातील जुन्या मोरगाव रोड नजीक एका अंध महिलेला चारचाकीने चिरडले. या घटनेमध्ये सदर महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
छबाबाई शंकर गिरमे असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. Baramati Accident News
बारामती शहरातील जुन्या मोरगाव रस्त्यावर ही अपघाताची घटना घडली. घटनेनंतर अपघात करणाऱ्या चारचाकी वाहनाखालून या महिलेला बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यातील वाहन व वाहनचालक निष्पन्न झाले असून आरोपीला ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिली आहे.