Balasaheb Shivarkar : न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळ यांच्यासह १२ जणांवर गुन्हा दाखल..


Balasaheb Shivarkar  : न्यायालयाचा अवमान करुन घर बळकावल्या प्रकरणी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, पोलीस निरीक्षक धनंयज पिंगळ यांच्यासह १२ जणांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला आहे.

माजी आमदार आणि माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळ, अरुण भुजबळ (रा. फातिमानगर, वानवडी), विद्या अरुण भुजबळ व मुलगा, प्रशांत पवार, उमेश भुजबळ, सदानंद तेलगु व त्यांची मुलगी आणि जावई, कांताबाई बंडोबंत लांडगे, राजेंद्र बापुराव सुर्वे, तुकाराम किसण अगरकर, सपना घोरपडे, मनिषा गायकवाड व इतर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकणी नानापेठ येथे राहणाऱ्या ६७ वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी यांचे वानवडी येथील सर्वे नं. 84/1 येथे घर आहे. या घराचा वाद न्याय प्रविष्ठ आहे. १० एप्रिल रोजी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळ यांच्यासह इतर आरोपींनी संगनमत करुन घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. आरोपींनी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान केला. Balasaheb Shivarkar

या प्रकरणी महिलेने न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वानवडी पोलिसांनी माजी आमदार व माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळ यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!