Badlapur : बदलापूर चिमुकलींवर अत्याचार प्रकरणात जमाव आक्रमक, शाळा फोडली, रेल्वे स्टेशनवर दगडफेक…

Badlapur : बदलापूर येथील एका मोठ्या शाळेत सफाई कर्मचाऱ्याने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने पुन्हा एकदा देश हादरले आहे. या घटनेनंतर पालक संतप्त आझाले असून त्यांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे.
तसेच संतप्त पालकांनी व आंदोलकांनी रेल्वे रोको आंदोलन केले आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी बदलापूर स्थानकात रेल्वे रुळावर उभे राहून घोषणा देऊन आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनामुळे या मार्गावरची सेवा ठप्प झाली आहे.
चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, अशी एकच मागणी नागरिकांनी लावून धरली आहे. मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिले, पोलिसांनी देखील आवाहन केलं, मात्र तरीदेखील नागरिक आपले आंदोलन मागे घ्यायला तयार नाही. Badlapur
सर्व विद्यार्थ्यांचे पालक, नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता चिमुकल्यांना न्याय मिळवण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आहे. बदलापूर स्थानकात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली आहे. तर, दुसरीकडे शाळेचं गेट तोडून आंदोलक आतमध्ये घुसले असून त्यांनी शाळेची नासधूस करण्यास सुरुवात केली आहे.
बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार झाल्यानंतर पालकांचा उद्रेक झाला आहे. संतापलेल्या पालकांनी आज शाळेबाहेर जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. तर संतप्त जमाव बदलापूर रेल्वे ट्रॅकवर उतरला आहे. आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. या प्रकरणानंतर आता कारवाई करण्यात आली आहे. शाळेनं माफीनामा जाहीर केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं असून मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आलं आहे. सजग नागरिकांकडून शाळेविरुद्ध आंदोलन करण्यात येत आहे. आता प्रशासनाकडून याप्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.