Badlapur : मोठी बातमी! बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी महाराष्ट्र बंदची हाक…

Badlapur : बदलापूर येथील एका मोठ्या शाळेत सफाई कर्मचाऱ्याने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने पुन्हा एकदा देश हादरले आहे. बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अमानुष अत्याचाराने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
संतप्त नागरिकांनी बदलापूर शहरात जोरदार आंदोलन केले असून, त्यांनी बदलापूर रेल्वे स्टेशनवर रेल्वे रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे ११ तासांहून अधिक वेळ वाहतूक ठप्प झाली आहे.
२४ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक…
दरम्यान, घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने राज्यभरात येत्या २४ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राज्यभरातून या बंदला व्यापक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. आघाडीच्या सर्व पक्षांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे, विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा उचलून धरला आहे.
कल्याण वकील संघटनेने आरोपी अक्षय शिंदेचे वकीलपत्र घेण्यास नकार दिला आहे. संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला असून, आरोपीला सरकारकडून वकीलपत्र मिळावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. Badlapur
तसेच, संघटनेने स्पष्ट केले आहे की, आरोपीच्या विरोधात ते मोफत केस लढवणार आहेत. आंदोलकांच्या अटकेबाबतही वकील संघटना मोफत कायदेशीर मदत देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.