Badlapur : बदलापूर अत्याचारप्रकरणी आरोपी अक्षय शिंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, कसून चौकशी होणार…

Badlapur : बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.
याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेंला अटक केली होती. अक्षय शिंदेला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानतंर आज पुन्हा त्याला कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने आरोपी अक्षय शिंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

बदलापुरातील दोन शालेय विद्यार्थिंनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे अटक केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केले होते. यानंतर कोर्टाने अक्षय शिंदेला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. Badlapur


कल्याण न्यायालयातील न्यायाधीश वी ए पत्रावळे यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली होती. यानतंर आता आरोपी अक्षय शिंदेची पोलीस कोठडी संपल्यानतंर पोलिसांनी पुन्हा एकदा त्याला कोर्टासमोर हजर केले.
दरम्यान, यावेळी कल्याण न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदेला १४ दिवसांपर्यंत म्हणजेच ९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यासोबतच याप्रकरणी शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका आणि सेक्रेटरी यांनाही आरोपी बनवण्यात आलं आहे.