Badlapur : बदलापूर अत्याचार प्रकरण! आरोपी अक्षय शिंदेला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी…


Badlapur : बदलापूरमधील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला २६ तारखेपर्यंत कल्याण न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (वय, २४) याला पोलिसांनी अटक केली होती. आज त्याला कल्याण न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. यावेळी झालेल्या सुनावणीनंतर कोर्टाने आरोपीला २६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या अक्षय शिंदे याला आज बुधवारी (ता. २१) न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत २६ ऑगस्टपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज कल्याण न्यायालयामध्ये आरोपीला हजर करण्यात आले होते. यावेळी आरोपीने अशा प्रकारचे अजून काही लैंगिक शोषण व कृत्य केल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

दरम्यान, बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर शाळेमधील शिपाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. या भयंकर घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!