Bachchu Kadu : मराठा समाजाला आरक्षण कधी मिळणार? आमदार बच्चू कडू यांचे सर्वात मोठे वक्तव्य, थेट तारीखच सांगितली…

Bachchu Kadu : राज्यात सध्या मराठा आरक्षण हा मुद्दा जोरदार पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं आहे. जरांगे पाटील यांनी २० जानेवारीपासून बीडमधून पदयात्रेला सुरुवात केली आहे.
त्यांच्या सहकाऱ्यांना आणि मराठा समाजबांधवांना घेऊन ते मुंबईत जाणार आहेत. त्यांची पदयात्रा शिरूरमध्ये दाखल झाली आहे. प्रहार जनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू हे आज आंदोलनात सहभागी होणार आहेत.
यापूर्वी बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. बोलताना ते म्हणाले की, जरांगे पाटील यांच्यावर बंदुकीच्या गोळ्यांची भाषा करण्याची वेळ येणार नाही. कारण त्यांची मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे, असे बच्चू कडू म्हणाले. Bachchu Kadu
बच्चू कडू पुढे म्हणाले की,५४ लाख मराठ्यांना कुणबी जातप्रमाणपत्रांपैकी ३९ लाख प्रमाणपत्रं वाटली आहेत. मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी राज्यात सर्वेक्षण सुरू झालं असून लवकरच ते सर्वेक्षण पूर्ण होईल. यापैकी काही नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी महिनाअखेरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळेल. असे ते म्हणाले आहे.
दरम्यान, जरांगे पाटील शुक्रवारी (ता.२६) मुंबईत चक्काजाम आंदोलन करून आझाद मैदानात दाखल होतील. त्यांची पदयात्रा शिरूरमध्ये दाखल झाली. यावेळी जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षण आता अंतिम टप्प्यात असून या लढाईसाठी सर्वांनी मोठ्या संख्येने मुंबईत यावं. संपूर्ण मराठा समाजाने आपल्यातील एकजूट कायम ठेवावी.
मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आम्हाला गोळ्या घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरणाार नाही. संपूर्ण राज्याचे लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे.