मृत घोषित केलेलं बाळ जिवंत झालं, पायाला टिचकी मारताच श्वास घेऊ लागलं! डॉक्टरांनी कसा केला चमत्कार?

धडगाव : तालुक्यातील तेलखेडी येथील महिला आपल्या दोन महिन्यांच्या बाळासह होळीला माहेरी सूर्यपूर येथे आली असताना दोन महिन्यांचे बाळ उलट्या आणि अति रडण्याने निपचित पडले. घरच्या लोकांना बाळाचा मृत्यू झाल्याचे वाटल्याने रडारड सुरू झाली. नंतर मात्र चमत्कार घडला. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत जवळच असलेल्या आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना माहिती मिळाली. त्यांनी रुग्णवाहिका पाठविली. वाटेतच रुग्णवाहिका थांबवून बाळाची तपासणी केली. हलकीच पायाला टिचकी मारली आणि बाळाने श्वास घेण्यास सुरुवात केली. यामुळे मोठा चमत्कार झाला. यामुळे या डॉक्टरांचे कौतुक केले जात आहे.
नातेवाईकांनी डॉक्टर गणेश तडवी यांना बोलावले असता दळवी यांनी आपला अनुभव वापरत मुलाच्या पायाला टिचकी मारली. बाळाने श्वास घेत हालचाल करायला सुरुवात केली त्यामुळे परिवारासाठी डॉक्टर हे देवदूत बनले. यामुळे बाळाला पुन्हा एकदा जीवनदान मिळाले आहे.
बाळाला उलट्यांमुळे डीहायड्रेशन झालं होतं. त्यामुळे बाळ जास्त रडल्याने श्वास बंद झाला होता, मात्र नातेवाईकांनी आणि वेळेस मला कॉल केल्यानंतर मी पोचलो आणि परिस्थिती पाहता परिवाराला सांगितलं की बाळाला रुग्णालयात दाखल करावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले.
मी त्या ठिकाणी उपचार सुरू केला आणि पायाला टिचक्या मारल्या त्यानंतर बाळ श्वास घ्यायला लागले आणि हालचाल करायला लागले, असे डॉक्टरांनी सांगितले. सध्या बाळावर उपचार सुरू केले आहेत. सध्या निमोनियाची साथ सुरू आहे.
त्यामुळे बाळाला निमोनिया होता, बाळाच्या आईला दूध कमी येत असल्याने सोडियम आणि कॅल्शियम कमी झाल्यामुळे बाळाला अधिक त्रास झाला होता. परंतु बाळ आता सुखरूप असून लवकरच आपल्या घरी परतणार असल्याच्या डॉक्टर मालविक कुलकर्णी यांनी सांगितले आहे.