Baba Siddiqui Death : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलीस खात्यातच पहिली कारवाई, सर्वात मोठी अपडेट आली समोर..

Baba Siddiqui Death : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येला आज ८ दिवस उलटले आहेत. १२ ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील निर्मलनगरमध्ये सिद्दीकी यांच्यावर तिघांनी गोळीबार केला, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सिद्दीकी यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली आहे, ज्यामुळे सिद्दीकींना सलमान खानशी जवळीक असल्याने टार्गेट केले गेल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून, चौकशीत नवनवे खुलासे होत आहेत.
अशातच आता सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे, त्यांच्या पोलीस सुरक्षा रक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. कॉन्स्टेबल श्याम सोनावणे यांच्यावर चूक झाल्याबद्दल निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
सिद्दीकींवर गोळीबार झाल्यानंतर सोनावणे यांच्याकडून योग्य सुरक्षा प्रदान करण्यात न येण्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. त्यांनी फटाक्यांच्या धुरामुळे दृश्यमानता कमी झाल्याचा फायदा घेत मारेकऱ्यांनी हल्ला केल्याचा दावा केला आहे. Baba Baba Siddiqui Death
तसेच सिद्दीकी यांना दिवसा दोन आणि रात्री एका कॉन्स्टेबलची सुरक्षा देण्यात आली होती. हत्या होणाऱ्या रात्री, या कॉन्स्टेबलने काय केले, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. निलंबनामुळे सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, कारण नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तींची चूक का झाली, हे स्पष्ट करणे आवश्यक आहे.
दरम्यान, सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांनी न्यायाची मागणी केली आहे. त्यांच्या मुलाने ट्विट करत म्हटले की, माझ्या वडिलांनी लोकांचं संरक्षण करताना जीव गमावला. आज माझे कुटुंब कोलमडले आहे. मला न्याय हवाय, माझ्या कुटुंबाला न्याय हवाय. यामुळे या प्रकरणात राजकारण आणि गुन्हेगारी यांचे संबंध उघडकीस येत आहेत.