Ayodhya Ram Mandir : अयोध्येत राम मंदिराच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशात होणार १ लाख कोटींची उलाढाल, बाजारपेठा फुलल्या…


Ayodhya Ram Mandir : सध्या राम मंदिराच्या कार्यक्रमाची तारीख जवळ येत आहे. याची जोरदार तयारी सुरू आहे. सध्या जरीपटके, टोपी, टी-शर्ट, राम मंदिराचे छायाचित्र असलेले कुर्ते आदींना बाजारात जोरदार मागणी सध्या आहे. यामुळे बाजारपेठ फुलली आहे.

राम मंदिराच्या प्रतिकृतीच्या मागणीतही कमालीची वाढ झालेली आहे. देशभरात ५ कोटींवर प्रतिकृतींची विक्री होईल, असा अंदाज आहे. प्रतिकृती निर्मिती उद्योग सुरू आहे. यामुळे अनेकांना रोजगार देखील मिळाला आहे.

प्राणप्रतिष्ठेपूर्वीच अर्थव्यवस्थेच्या पंखांतून जटायूचे बळ भरले गेले असून देशात एक लाख कोटी रुपयांची उलाढाल होईल. असा अंदाज अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) वर्तविलेला आहे. यामुळे तयारी जोरदार सुरू आहे. Ayodhya Ram Mandir

दिल्लीतच २० हजार कोटी रुपयांवर उलाढाल होईल, अशी शक्यता आहे. कॅटचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले, २२ जानेवारीपूर्वी व्यापार्‍यांसह अन्य सामाजिक संघटनांतर्फे देशात ३० हजारांवर कार्यक्रम आयोजिण्यात आलेले आहेत.

याआधी महासंघाने प्राणप्रतिष्ठेच्या अनुषंगाने ५० हजार कोटी रुपयांचा व्यापार होईल, असा अंदाज वर्तविला होता. मात्र, दिवसागणिक दिल्लीसह देशभरातील वाढत गेलेला उत्साह पाहता तो दुपटीवर जाईल, असे संकेत मिळत आहेत. यामुळे व्यापाऱ्यांना चांगले दिवस आले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!