वाहनधारकांनो लक्ष द्या! HSRP नंबर प्लेट कोणत्या वाहनाला लागते आणि कोणत्या वाहनाला नाही? जाणून घ्या संपूर्ण माहिती..

नवी दिल्ली: वाहनधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आपल्या वाहनासाठी HSRP अनिवार्य आहे का? हा अनेक वाहनधारकांसाठी एक मोठा प्रश्न बनला आहे. केंद्र सरकारच्या नियमांनुसार, वाहन सुरक्षा वाढवण्यासाठी आणि चोरी टाळण्यासाठी ही सुरक्षा नंबर प्लेट लावणे बंधनकारक केले गेले आहे.

तसेच नियम पाळले नाही, तर तुम्हाला ₹५,००० ते ₹१०,००० पर्यंत दंड भरावा लागू शकतो. दरम्यान, HSRP नियम सर्व वाहनांवर लागू आहेत, परंतु अंमलबजावणी वाहनाच्या नोंदणी तारखेनुसार ठरवण्यात आली आहे.

जुन्या वाहनांवर (दुचाकी, कार, रिक्षा, ट्रक, व्यावसायिक वाहने) HSRP प्लेट बसवणे अनिवार्य आहे.महाराष्ट्र परिवहन विभागाने या वाहनांसाठी अंतिम मुदत वाढवून ३० नोव्हेंबर २०२५ केली आहे.नियमाचे पालन न करणाऱ्यावर १ डिसेंबर २०२५ पासून कडक कारवाई होईल. Flying Squad ने तपासणी करून दंड लावला जाईल.

नवीन वाहनांवर HSRP प्लेट आधीच (Vehicle Manufacturer/Dealer कडून) बसवलेली असते.अशा वाहनांच्या मालकांना नवीन अर्ज करण्याची किंवा प्लेट बदलण्याची गरज नाही.
HSRP प्लेट म्हणजे काय?
HSRP ही अल्युमिनियमची विशेष नंबर प्लेट आहे, ज्यात अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.
मुख्य वैशिष्ट्ये…
होलोग्राम : डाव्या बाजूला अशोक चक्राचा होलोग्राम असतो, जो बनावट प्लेट्सला प्रतिबंध करतो.
युनिक लेझर कोड: प्रत्येक प्लेटवर लेझरने कोरलेला पिन नंबर वाहनाच्या चेसिस क्रमांकाशी जोडलेला असतो. हे केंद्रीय डेटाबेसमध्ये नोंदवले जाते.
स्नॅप लॉक रिव्हेट्स: विशेष स्क्रू वापरून बसवलेली प्लेट एकदा काढल्यास पुन्हा वापरता येत नाही, त्यामुळे चोरी झालेल्या वाहनावर गैरवापर करणे कठीण होते.
वाहनाच्या प्रकारानुसार HSRP प्लेटची किंमत खालीलप्रमाणे आहे (GST समाविष्ट)….दुचाकी, स्कूटरसाठी ₹५३१,तीन चाकी वाहन (ऑटो- रिक्षा) ₹५९०,कार, ट्रक ₹८७९ रुपये.
HSRP न बसवल्यास काय कारवाई होईल?
दंड: ₹५,००० ते ₹१०,००० पर्यंत होऊ शकतो. तसेच इतर निर्बंध देखील लागू होऊ शकतात जसे की मालकी हस्तांतरण,पत्ता बदलणे आणि वाहनावर कर्ज घेणे किंवा कर्ज फेडणे इत्यादी.यानुसार, HSRP नंबर प्लेट न बसवल्यास तुमच्या वाहनासंबंधित महत्त्वाच्या RTO सेवा उपलब्ध होणार नाहीत.
