Asia Cup 2023 : भारताचा श्रीलंकेला दे धक्का! दणदणीत विजय मिळवत आठव्यांदा जिंकले विजेतेपद…

Asia Cup 2023 कोलंबो : आज झालेल्या आशिया चषक २०२३ (Asia Cup 2023) स्पर्धेचा अंतिम सामना भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात झाला. टीम इंडियाने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवत आठव्यांदा विजेतेपद जिंकले आहे. यामुळे चाहते जाम खुश आहेत. (Asia Cup 2023)

टीम इंडियाने सुपर ४ फेरीत श्रीलंकेला हरवत थेट फायनलमध्ये प्रवेश केला होता. तसेच फायनलचे तिकिट मिळवणारा भारत हा पहिला संघ ठरला होता. यामुळे याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले होते. टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजने ७ षटकात २१ धावा देत ६ बळी घेतले.
यामुळे हा विजय सोप्पा झाला. भारताने श्रीलंकेचा १० गडी राखून दारुण पराभव केला असून अंतिम सामन्यात विजयासाठी टीम इंडियासमोर केवळ ५१ धावांचे लक्ष्य होते, जे टीम इंडियाने केवळ ६.१ षटकात पूर्ण केले.

दरम्यान टीम इंडियाच्या आक्रमक गोलंदाजांपुढे श्रीलंकेचा निभाव लागला नाही. त्यांची सगळी टीम ढासळत गेली. त्यांनी १५ केवळ ५० धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाचा सहज विजय झाला. शुभमन गिलने नाबाद २७ आणि ईशानने नाबाद २३रन केल्या. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर हा सामना झाला.
